E-Paperhttps://majhaindianews.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifटॉप न्यूज़दिल्ली NCRदेशमहाराष्ट्र
Trending
भारतीय दलित साहित्य अकादमी दिल्ली यांच्या द्वारा डॉ श्री जयद्रथ आत्माराम आखाडे यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक फेलोशिप राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

- *भारतीय दलित साहित्य अकादमी दिल्ली यांच्या द्वारा डॉ श्री जयद्रथ आत्माराम आखाडे यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक फेलोशिप राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

दिल्ली : दिनांक १८ डिसेंबर २०२५….(माझा इंडिया न्यूज)
भारतीय दलित साहित्य अकादमी दिल्ली यांनी महाराष्ट्रातील तसेच देशातील अनेक राज्यांतील मान्यवर कवी कवयित्री, कलाकार, पत्रकार, नाटककार , लेखक यांची वेगवेगळ्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. दिनांक १२ व १३ डिसेंबर २०२५ रोजी झडोंदा गाव, पंचशील भवन – दिल्ली येथे आयोजित केलेल्या भव्य कार्यक्रमात महाराष्ट्रातुन पुणे जिल्ह्यातील कवीवर्य *डॉ श्री जयद्रथ आत्माराम आखाडे यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय फेलोशिप अवार्ड- २०२५ पुरस्कार देण्यात आला. भा.द.साहित्य अकादमी – दिल्ली संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. प्रा. डॉ. एस पी सुमनाक्षर यांच्या शुभ हस्ते आणि आयु. संघ प्रिय गौतम , माजी केंद्रीय मंत्री, प्रमुख संस्थापक अध्यक्ष यांचे उपस्थितीत पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांचे विविध क्षेत्रातून अभिनंदन व शुभेच्छा दिल्या जात आहेत.*




