E-Paperटॉप न्यूज़बॉलीवुडमहाराष्ट्रराजनीतिराज्यलोकल न्यूज़

PCMC election : पिंपरीत सात पक्षांचे शहराध्यक्ष निवडणुकीच्या मैदानात..

PCMC election : पिंपरीत सात पक्षांचे शहराध्यक्ष निवडणुकीच्या मैदानात..
भाजप ,दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना शिंदे ,महाराष्ट्र नवनिर्माण सेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट ,आणि आम आदमी पार्टी असे सात पक्षांचे शहराध्यक्ष पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक मैदानात उतरले आहेत

पिंपरी: त्यापैकी कोणता शहराध्यक्ष महानगरपालिका सभागृहात जाणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे ..!

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यंदाच्या निवडणुकीत विविध ७ राजकीय पक्षांचे शहराध्यक्ष स्वतः उमेदवार आहेत त्यापैकी तीन पक्षांचे शहराध्यक्ष पहिल्यांदाच आपले नशीब आजमावत आहेत पिंपळे सौदागर प्रभाग क्रमांक 28 मध्ये भाजपचे शहराध्यक्ष माजी नगरसेवक शत्रुघन काटे हे उमेदवार आहेत ..वल्लभनगर कासरवाडी पिंपरी प्रभाग क्रमांक ९ मधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे शहराध्यक्ष योगेश बहल पुन्हा निवडणूक आखाड्यात आहेत ते माजी महापौर असून त्यांनी सत्ता रूढ पक्षनेते विरोधी पक्षनेते पद ही भूषविले आहे ते सातव्यांदा निवडणूक लढवत आहेत
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे पिंपळे निलक कस्पटे वस्ती वाकड प्रभाग क्रमांक 26 मधून लढत आहेत तेही माजी नगरसेवक असून दुसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत ते मागील वेळी भाजपकडून निवडून आले होते ..निगडी यमुना नगर प्रभाग क्रमांक १३ मधून मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले दुसऱ्यांदा लढत आहेत मागील वेळी ते पहिल्यांदा निवडणूक निवडून आले होते शिवसेनेचे संदेश शहर प्रमुख निलेश तरस हे रावेत किवळे मामुर्डी प्रभाग क्रमांक 16 येथून पहिल्यांदाच निवडणूक रणांगणात उतरले आहेत

वाकड ताथवडे पुनावळे प्रभाग क्रमांक २५ मधून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे शहराध्यक्ष कुणाल वाव्हळकर हे देखील पहिल्यांदा निवडणूक लढवत आहेत पिंपळे निलख कस्पटे वस्ती प्रभाग क्रमांक 26 मधून आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष रविराज काळे हे पहिल्यांदा निवडणूक रिंगणात उतरले आहेत या शहराध्यक्षांना पक्षांच्या सर्व उमेदवारासह आपल्या प्रभागात प्रचार यंत्रणा सांभाळावी लागणार आहे

७ माझी महापौर निवडणुकीच्या रिंगणात

माजी महापौर योगेश बहल हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून प्रभाग क्रमांक २० संत तुकाराम नगर कासारवाडी मधून.. प्रभाग क्रमांक ९ नेहरूनगर खराळवाडी दोन वैशाली घोडेकर निवडणूकच्या रिंगणात आहेत भाजपकडून प्रभाग क्रमांक 19 चिंचवड केशवनगर मधून अपर्णा डोके.. प्रभाग क्रमांक ३२ सांगवी शितोळे नगरीतून उषा ढोरे.. प्रभाग क्रमांक 29 पिंपळे गुरव जवळकर नगर मधून शकुंतला दराडे.. प्रभाग क्रमांक २ मोशी, जाधववाडीतून राहुल जाधव.. प्रभाग क्रमांक ३ चरोली डुडुळगाव मधून नितीन काळजे हे माजी महापौर निवडणूक रिंगणात आहेत बहल यांच्या विरोधात भाजपचे सतीश नागरगोजे घोडेकर यांच्यासमोर मोठे भाजपच्या मिनाज इमानदार डोके यांची लढत.. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या पूजा दराडे यांची लढत सुनीता कोळप जाधव यांची लढाई विशाल आहेर यांना त्यांच्याच पक्षाच्या माजी नगरसेविका शारदा सोनवणे यांनी आव्हान दिले आहे

तीन प्रभागात पती-पत्नी मैदानात

 

महानगरपालिकेच्या तीन प्रभागामातून पती-पत्नी दोघेही नशीब आजमावत आहेत निगडी यमुना नगर प्रभाग क्रमांक 13 मधील दोन गटामधून मनसेने शहराध्यक्ष सचिन चिखले आणि माजी नगरसेविका अश्विनी चिखले हे दोघं पती-पत्नीमैदानात उतरवले आहे.. रावेत मामुर्डी किवळे प्रभाग क्रमांक 16 मध्ये दोन जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे व त्यांच्या पत्नी जयश्री भोंडवे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.. पिंपळे सौदागर प्रभाग क्रमांक 28 येथील दोन जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून माजी विरोधी पक्षनेते नाना काटे व त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका शितल काटे लढत आहेत हे तीनही जोडपे महापालिका सभागृहात प्रवेश करणार का याची सर्वांना उत्सुकता निर्माण झाली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!