E-Paperटॉप न्यूज़देशधर्ममहाराष्ट्र

शिव चरित्र म्हणजे समृद्ध जगण्याची खरी गुरुकिल्ली होय”..!. – शिवशाहीर विजय महाराज तनपुरे 

 

शिव चरित्र म्हणजे समृद्ध जगण्याची खरी गुरुकिल्ली होय”..!. – शिवशाहीर विजय महाराज तनपुरे 

  • दिनांक 9 फेब्रुवारी 2026  :  प्रतिनिधी (माझा इंडिया न्यूज)डांगे चौक, चिंचवड येथे पिंपरी चिंचवडमहानगरपालिकेचे वतीने  अयोजीत करण्यात आलेल्या “छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधक पर्व 2026 ” चे अंतर्गत यशाचा नवा मंत्र शिवतंत्र या विषयावर व्याख्यान देताना ते बोलत होते.
    यावेळी नगरसदस्या शालिनी ताई गुजर, विशेष अधिकारी किरण गायकवाड, निवेदक किशोर केदारी, ज्येष्ठ पत्रकार तथा शिव व्याख्याते अनिल वडघुले, करण तुपे, संकेत जोशी, शंकर जगताप काका माउली, आदी.उपस्थित होते.

सुप्रसिद्ध शिव शाहीर डॉक्टर विजय तनपुरे यांनी यशाचा नवा मंत्र शिवतंत्र या विषयावर प्रभावी ओजस्वी आणि प्रेरणा दायी मार्गदर्शन केले. डॉक्टर तणपुरे यांनी खास शैलीतून छत्रपती शिवाजी महाराजlच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग उलगडत शिव चरित्राचा आजच्या काळाशी संबंध जोडला.
शिव चरित्र हे केवळ इतिहास नाहि, तर तेजीवन जगण्याची दिशा देणारे तत्वन्यान आहे.नेतृत्व , शौर्य, संघटनशक्ती , दूरदृष्टी अणि स्वाभिमान या मूल्यांचा संगम म्हणजे शिव चरित्र असे त्यांनी स्पष्ट केले.
प्रत्येकाने आपल्या जीवनात स्वराज्याची भावना जlगवली पाहिजे, तर समाज समृद्ध होईल असा संदेशही त्यांनी यावेळी दिला.

आजच्या युवकांसमोर आसलेल्या स्पर्धा, ताणतणाव आणि दिशाहीनता यांचा उल्लेख करत त्यांनी आत्मविश्वास अणि कर्तुत्व यांची जोड देण्याचे महत्त्व पटवून दिले. भीतीवर मात करून पूढे जाणे हेच खरे शिव तत्व आहे. असे सांगत त्यांनी तरुणांना स्वप्न पाहण्याचे अणि त्या स्वप्नांसाठी कृती करण्याचे आव्हान केले. त्याच्या प्रभावी मांडणी मुळे उपस्थितांमध्ये उत्साह आणि प्रेरणा निर्माण झाली.
कार्यक्रमा दरम्यान वातावरण उत्स्फूर्त टाळ्यांचा कडकडाट होत होता. शिवजयंती उत्सवाला बौद्धिक आणि प्रेरणा दायी परिमाण लाभल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.
छत्रपती शिवाजी महाराज प्रबोधन पर्वाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या व्याख्यानातून शिवकालीन विचारांचे आधुनिक संदर्भात पुनरुज्जीवन झाले असुन नागरिकांनी मोठया संख्येने सहभाग घेत कार्यक्रम यशस्वी केला.
दरम्यान, तणाव विरहित जीवन जगण्यासाठी च्या ध्याना सह आपल्या कुटुंबा प्रती व आपल्या प्रिय व्यक्ति प्रती आभार व्यक्त करण्याचे ध्यान डॉक्टर विजय महाराज तनपुरे यांनी प्रेक्षकांनकडून करून घेतले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विशेषअधिकारी किरण गायकवाड यानी तर सूत्र संचालन किशोर केदारी यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
error: Content is protected !!