. व्हि. एम. इंडस्ट्रीज वराळे चाकण या कंपनीचे व्यवस्थापक सचिन पाटील यांनी पाच लाख रूपयांची फसवणूक केल्याने कारवाई करा.:- हर्षद खान प्रो.प्रो न्यू लाईफ बॅटरी यांची मागणी

बी. व्हि. एम. इंडस्ट्रीज वराळे चाकण या कंपनीचे व्यवस्थापक सचिन पाटील यांनी पाच लाख रूपयांची फसवणूक केल्याने कारवाई करा.:- हर्षद खान प्रो.प्रो न्यू लाईफ बॅटरी यांची मागणी
चाकण:- दिनांक, ०४/०२/२६ , प्रतिनिधी ( माझा इंडिया न्यूज) बी. व्हि. एम. इंडस्ट्रीज वराळे चाकण या कंपनीचे व्यवस्थापक सचिन पाटील संपर्क नंबर 90110135710यांनी पाच लाख रूपयांची आर्थिक फसवणूक केल्याने कारवाई करण्या संदर्भात उत्तर म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी अर्ज देऊन मागणी केली आहे.
तक्रारदाराच्या माहितीनुसार.., पाच लाख रुपये (५,००,०००) बी. व्हि. एम. कंपनीच्या वराळे चाकण यांच्या खात्यात डिपोजिट अनामत रक्कम घेऊन स्क्रॅप न देता फसवणूक केल्याची तक्रारी अर्ज न्यू लाईफ बॅटरी चे प्रो प्रो ईश्वर परदेशी व हर्षद खान यांनी दिला आहे.
तक्रारी अर्जात नमूद केले आहे की,वरील कंपनी मध्ये स्क्रॅप विकण्यासाठी आहे अशी माहिती आम्हाला श्री अविनाश लोंढे संपर्क:- 9172651217 यांनी दिली.
वरील कंपनीचे स्क्रॅप बाजार भावाप्रमाणे विकत घेण्यासाठी आम्ही तयार झालो. ३० सप्टेंबर २०२५ रोजी स्क्रॅपसाठी लागणारे पाच लाख रुपये अनामत रक्कम डिपोजीट मी वरील कंपनी मध्ये आरटीजीएसने केले.
तक्रारी अर्जात म्हटले आहे की १३डिसेंबर २०२५ ते १६डिसेंबर २०२५ रोजी आम्ही त्या वरील कंपनीचा माल खरेदी केला, व त्या स्क्रॅप मालाचे पेमेंट त्यांना हिशोब करून पूर्ण दिला. परंतु जवळ पास दिड महिना उलटून सुद्धा त्यांनी आम्हाला परत स्क्रॅप माल दिला नाही तसेच आम्ही दिलेले डिपोजिट अनामत रक्कम पाच लाख रुपये परत देत नाहीत.
म्हणून बी व्हि एम कंपनीचे व्यवस्थापक सचिन पाटील व अविनाश लोंढे यांनी आम्हची फसवणूक केली आहे तरी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी स्क्रॅप उद्योजक ईश्वर परदेशी व हर्षद खान यांनी उत्तर म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेब यांच्याकडे केली आहे.



