सांगवी पोलिस ठाण्यात शिवसेनेचे निवेदन; सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला जाहीर पाठिंबा
माझा इंडिया न्यूज | पिंपरी-चिंचवड
सांगवी पोलिस ठाण्यात शिवसेनेचे निवेदन; सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला जाहीर पाठिंबा
पिंपरी-चिंचवड, दि. १७ जुलै : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सांगवी विभागाच्या वतीने सांगवी पोलिस ठाण्यात निवेदन देत समाजसेवक सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला जाहीर पाठिंबा व्यक्त करण्यात आला. तसेच केंद्र सरकारने या प्रकरणात तातडीने भूमिका घ्यावी, अशी मागणी करण्यात आली.
निवेदनात म्हटले आहे की, NEET पेपरफुटी प्रकरणामुळे लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान झाले असून, या प्रश्नाकडे केंद्र सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे. तसेच सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त करत, त्यांचे उपोषण संपवण्यासाठी सरकारने सकारात्मक पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशीही मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सांगवी विभागाच्या वतीने करण्यात आली.
निवेदन सादर करताना मोहन बारटक्के (शिवदूत), राजाभाऊ तुपे (शिवदूत), विजय साने (उपशहर प्रमुख, चिंचवड विधानसभा), अमित सुवासे (विभाग प्रमुख), अमित निंबाळकर (विभाग प्रमुख), राजू खाडे (शाखाप्रमुख), सचिन कांबळे (शाखाप्रमुख), राजरत्न भोसले (उपशाखाप्रमुख), तुळसिदास केवतकर (उपशाखाप्रमुख), अमेय बारटक्के (युवासेना सचिव, चिंचवड विधानसभा), महेश लाड (उपशाखाप्रमुख) यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
– माझा इंडिया न्यूज


