प्रभाग क्रमांक ११ मध्ये पावसाळ्यापूर्वी ड्रेनेज व स्ट्रॉम वॉटर लाईन कामांना गती..! – मारुती जाधव

प्रभाग क्रमांक ११ मध्ये पावसाळ्यापूर्वी ड्रेनेज व स्ट्रॉम वॉटर लाईन कामांना गती..! – मारुती जाधव

पिंपरी-चिंचवड | दिनांक २२ जून, प्रतिनिधी (माझा इंडिया न्यूज)
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक ११ मध्ये पावसाळ्यापूर्वी ड्रेनेज व स्ट्रॉम वॉटर लाईनच्या साफसफाई आणि दुरुस्तीच्या कामांना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सामाजिक कार्यकर्ते मारुती जाधव यांनी नागरिकांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवत सातत्याने पाठपुरावा केल्याने या कामांना सुरुवात करण्यात आली आहे.
दरवर्षी पावसाळ्यात भीमशक्ती नगर, कृष्णानगर, महात्मा फुले नगर, घरकुल, कोयना नगर, शरद नगर तसेच परिसरातील विविध भागांमध्ये पाणी साचणे, ड्रेनेज तुंबणे आणि अस्वच्छतेच्या समस्यांचा नागरिकांना सामना करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर मारुती जाधव यांनी फ क्षेत्रीय कार्यालयाकडे निवेदन देऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली होती.
प्रशासनाने या मागणीची दखल घेत प्रभागातील नाले, ड्रेनेज लाईन आणि स्ट्रॉम वॉटर लाईनची साफसफाई व दुरुस्तीची कामे सुरू केली आहेत. या कामांमुळे पावसाचे पाणी वेगाने वाहून जाण्यास मदत होणार असून रस्त्यांवर सांडपाणी साचण्याच्या समस्येत मोठी घट होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
याबाबत बोलताना मारुती जाधव म्हणाले, “नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी सातत्याने पाठपुरावा करणे हे आमचे कर्तव्य आहे. प्रशासनाने आमच्या मागणीची दखल घेऊन कामांना सुरुवात केल्याबद्दल त्यांचे आभार. उर्वरित कामेही लवकर पूर्ण करून नागरिकांना कायमस्वरूपी दिलासा मिळावा, ही अपेक्षा आहे.”
या कामांमुळे विशेषतः घरकुल आणि भीमशक्ती नगर परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून प्रभागातील नागरिकांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासन, फ क्षेत्रीय कार्यालय आणि संबंधित विभागांचे आभार मानले आहेत.
– माझा इंडिया न्यूज
पिंपरी-चिंचवड




