E-Paperटॉप न्यूज़दुनियादेशधर्ममहाराष्ट्रयुवाराजनीतिराज्यलोकल न्यूज़

प्रभाग क्रमांक २५ मध्ये “शासन आपल्या दारी” उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..!! नगरसेवक कुणाल वाव्हळकर 

प्रभाग क्रमांक २५ मध्ये “शासन आपल्या दारी” उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..!! नगरसेवक कुणाल वाव्हळकर 

पिंपरी-चिंचवड, दि. २० जून :  प्रतिनिधी (माझा इंडिया न्यूज). पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रभाग क्रमांक २५ मधील धडाडीचे नगरसेवक कुणाल वाव्हळकर यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या “शासन आपल्या दारी” या जनहिताच्या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
चिंचवड चे आमदार शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली “शासन आपल्या दारी”
या उपक्रमाअंतर्गत नागरिकांना उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, आयुष्मान भारत कार्ड, रेशन कार्ड, पॅनकार्ड दुरुस्ती तसेच विविध शासकीय कागदपत्रे व योजनांचा लाभ मोफत उपलब्ध करून देण्यात आला.

शासनाच्या सेवा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सहज आणि सुलभ पद्धतीने पोहोचाव्यात, तसेच आवश्यक कागदपत्रांसाठी होणारी धावपळ कमी व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

सकाळपासूनच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विविध शासकीय सेवांचा लाभ घेतला. शेकडो नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घेत समाधान व्यक्त केले.

यावेळी नगरसेवक धर्मपाल तंतरपाळे, युवा नेते चेतन भाऊ भुजबळ, लक्ष्मीदीप सोसायटीचे चेअरमन रामभाऊ गावंडे, सामाजिक कार्यकर्ते धनंजय कोयते, अमोल डोंगरे, योगेश भोसले, किरण समिंदर, अविनाश शिरसाठ, संतोष भेंगळे, रजनीकांत वाव्हळकर,  विशाल ,वाव्हळकर रोहित पारदे, प्रमोद शिंदे, आप्पा माने यांच्यासह अनेक मान्यवर, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या उपक्रमामुळे नागरिकांना आवश्यक कागदपत्रे मिळविणे अधिक सुलभ झाले असून परिसरातील नागरिकांनी नगरसेवक कुणाल वाव्हळकर यांच्या या उपक्रमाचे स्वागत करत समाधान व्यक्त केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!