E-Paperमहाराष्ट्र
Trending

“चिखली कुळवाडी मोरेपाटील चौकात मोडलेला सिग्नल पोल जीवघेणा धोका; शिवशाही व्यापारी संघ शिरूर लोकसभा अध्यक्ष हर्षद भाई खान यांच्या सतर्कतेमुळे भीषण अपघात टळला – PCMC ने 24 तासांत दुरुस्ती करावी”

 

चिखली कुदळवाडी मोरेपाटील चौकात मोडलेला सिग्नल पोल जीवघेणा धोका; शिवशाही व्यापारी संघ शिरूर लोकसभा अध्यक्ष हर्षद भाई खान यांच्या सतर्कतेमुळे भीषण अपघात टळला – PCMC ने 24 तासांत दुरुस्ती करावी”

पिंपरी-चिंचवड/चिखली, दि. 02 जून 2026 प्रतिनिधी (माझा इंडिया न्यूज) चिखली कुदळवाडी मोरेपाटील चौक, भोसरी MIDC येथील मुख्य सिग्नलचा पोल तुटून सिग्नलसह रस्त्याच्या मध्यभागी पडला आहे. तुटलेल्या वीज तारा लोंबकळत का आहेत. हा भोसरी MIDC चा मुख्य चौक असून रोज हजारो कामगार, विद्यार्थी, अवजड वाहने येथून जातात. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे कोणत्याही क्षणी जीवघेणा अपघात होऊ शकला असता पण…

हर्षद भाई खान यांची तत्परता:
शिवशाही व्यापारी संघ शिरूर लोकसभा अध्यक्ष भाई हर्षद भाई खान यांच्या लक्षात ही बाब येताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन:
1. बॅरिकेड लावून रस्ता तात्पुरता बंद केला व अपघात टाळला.
2. PCMC, MSEDCL व MIDC भोसरी पोलिसांना तातडीने कळवून जीवितहानी रोखली.
3. स्थानिक नागरिक व वाहतुकीला सतर्क करून पर्यायी मार्ग दिला.

हर्षद भाई खान म्हणाले, “मोरेपाटील चौक म्हणजे चिखलीचा कणा आहे. इथे सिग्नल नसल्याने अपघात होणार हे नक्की होते. मी वेळेत पोहोचलो म्हणून आज वाचलो. PCMC झोपा काढतेय का? 24 तासांत हा मोडका पोल काढून नवीन LED सिग्नल पोल बसवा, नाहीतर शिवशाही रस्त्यावर उतरेल.”

शिवशाही व्यापारी संघ अध्यक्ष युवराज भगवान दाखले यांची मागणी:
“हर्षद भाई खान यांनी एक जबाबदार शिवसैनिकाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या सतर्कतेला सलाम. PCMC आयुक्तांनी चिखली कुळवाडी मोरेपाटील चौकाची तातडीने पाहणी करून आज रात्रीपर्यंत तुटलेल्या तारा व पोल काढावेत व तात्पुरता सिग्नल/होमगार्ड तैनात करावा. 7 दिवसांत कायमस्वरूपी नवीन सिग्नल बसवावा.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!