E-Paperटॉप न्यूज़दुनियादेशधर्मपिंपरी चिंचवडमहाराष्ट्रयुवाराजनीति

आषाढी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर महापौर रवि लांडगे यांची पालखी मार्गाची पाहणी; वारकऱ्यांसाठी सर्व सुविधा उपलब्ध करण्याच्या सूचना

आषाढी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर महापौर रवि लांडगे यांची पालखी मार्गाची पाहणी; वारकऱ्यांसाठी सर्व सुविधा उपलब्ध करण्याच्या सूचना

पिंपरी | दि. ३ जुलै २०२६ | माझा इंडिया न्यूज 

आषाढी एकादशी निमित्त संतश्रेष्ठ श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरातील पालखी मार्गावरील नागरी सुविधांची महापौर रवि लांडगे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. वारकरी बांधवांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

महापौरांनी मॅगझीन चौक ते भक्ती-शक्ती चौक, निगडी या पालखी मार्गाची पाहणी करत स्वच्छता, रस्त्यांची स्थिती, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, चलत शौचालये, आरोग्य पथके, रुग्णवाहिका, अग्निशमन यंत्रणा, वाहतूक नियोजन, प्रकाश व्यवस्था आणि दिशादर्शक फलक यांचा सविस्तर आढावा घेतला.

यावेळी त्यांनी वारकरी बांधवांच्या सुरक्षेसाठी पालखी मार्गावर टेहळणी टॉवर उभारण्याच्या सूचना दिल्या. तसेच स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य देत सर्व आवश्यक सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्याचे निर्देशही दिले.

पाहणी दौऱ्याला अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, सहशहर अभियंता बापू गायकवाड, उपआयुक्त अण्णा बोदडे, क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, निवेदिता घार्गे, कार्यकारी अभियंता शिवाजी चौरे, दमयंती पवार, चंद्रकांत मुथाळ, जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह आरोग्य, स्वच्छता, पाणीपुरवठा, विद्युत, वाहतूक आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

महापौर रवि लांडगे म्हणाले की, “पालखी सोहळा हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि सामाजिक परंपरेचा अमूल्य वारसा आहे. वारकरी बांधवांना सुरक्षित, स्वच्छ आणि सर्व सुविधायुक्त वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेची यंत्रणा सज्ज असून सर्व विभागांनी जबाबदारीने आणि समन्वयाने काम करावे.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!