E-Paperhttps://majhaindianews.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifदेशपिंपरी चिंचवडमहाराष्ट्रराजनीति

भोसरी विधानसभेसाठी महापौर रवी लांडगे यांची दावेदारी?

भोसरी विधानसभेसाठी महापौर रवी लांडगे यांची दावेदारी?

पिंपरी-चिंचवड : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भोसरी विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या राजकारणात महत्त्वाची चर्चा सुरू झाली आहे. पिंपरी-चिंचवडचे महापौर रवी लांडगे यांनी प्रथमच आमदारकीच्या इच्छेबाबत स्पष्ट विधान करत भोसरी विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून निवडणूक लढविण्याचे संकेत दिले आहेत.

एका युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत रवी लांडगे म्हणाले, “मी आमदार व्हावे ही समाजाची इच्छा आहे आणि समाजासाठी आमदार होण्याची माझीही इच्छा आहे. कारण, मी समाजासाठीच काम करीत आहे.”

या वक्तव्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी रवी लांडगे हे भाजपचे संभाव्य दावेदार असल्याच्या चर्चेला वेग आला आहे.

सध्या भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे आहेत. त्यांची ही तिसरी टर्म असून, एकदा अपक्ष आणि दोन वेळा भाजपच्या कमळ चिन्हावर त्यांनी विजय मिळवला आहे. त्यामुळे रवी लांडगे यांच्या विधानामुळे भाजपच्या स्थानिक राजकारणात आगामी काळात समीकरणे कशी बदलणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, रवी लांडगे यांनी यापूर्वी भाजप सोडून शिवसेना (ठाकरे) पक्षात प्रवेश केला होता. मात्र, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पुन्हा भाजपमध्ये घरवापसी केली आणि त्यांची महापौरपदी निवड झाली.

‘पक्ष सोडल्याचा खूप पश्चाताप झाला’

आपल्या राजकीय प्रवासाबाबत बोलताना रवी लांडगे यांनी भाजप सोडल्याचा पश्चाताप झाल्याचेही सांगितले. “सत्य आणि निर्भीड बोलणे अडचणीचे ठरते. त्याच्या परिणामामुळे मला एकेकाळी भाजप सोडावा लागला. पक्ष सोडल्याचा खूप पश्चाताप झाला. लहानपणापासून ज्या विचारांमध्ये वाढलो, ते विचारच आयुष्यातून निघून गेले असे वाटत होते. पुन्हा पक्षात परत आल्याचा खूप आनंद आहे,” असे त्यांनी सांगितले.

तसेच, सध्या महापौर म्हणून समाजकार्य करत राहणार असून भविष्यात पक्ष जो आदेश देईल, त्यानुसार काम करणार असल्याचेही रवी लांडगे यांनी स्पष्ट केले.

रवी लांडगे यांच्या “समाजासाठी आमदार होण्याची माझीही इच्छा आहे” या वक्तव्यामुळे भोसरी विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवारीची चर्चा आता अधिक रंगण्याची शक्यता आहे.

माझा इंडिया न्यूज
पिंपरी-चिंचवड
#MajhaIndiaNews #रवी_लांडगे #पिंपरीचिंचवड #पिंपरीमहापौर #भोसरीविधानसभा #भोसरी #आमदारकी #भाजप #BJP #रवी_लांडगे_दावेदारी #विधानसभा_निवडणूक #पिंपरीचिंचवड_राजकारण #महाराष्ट्रराजकारण #राजकीयबातमी #BreakingNews #MarathiNews #PimpriChinchwad #Bhosari #RaviLandge #MaharashtraNews

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!