गणराया, दुष्काळावर मात करण्याची शक्ती दे; शेतकऱ्यांना लवकर मदत करण्याची गरज – सचिन अहिर
दुष्काळाच्या प्रश्नावर विशेष अधिवेशनाचा प्रस्ताव नाही; आगामी अधिवेशनात आमदारांना मांडता येणार भूमिका

गणराया, दुष्काळावर मात करण्याची शक्ती दे; शेतकऱ्यांना लवकर मदत करण्याची गरज – सचिन अहिर
दुष्काळाच्या प्रश्नावर विशेष अधिवेशनाचा प्रस्ताव नाही; आगामी अधिवेशनात आमदारांना मांडता येणार भूमिका

पिंपरी, पुणे | प्रतिनिधी : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर दुष्काळाचे संकट आले असून, “गणराया, दुष्काळावर मात करण्याची शक्ती दे,” अशी प्रार्थना गणपती बाप्पाच्या चरणी केल्याचे विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी सांगितले.
भोसरी येथील CIE Automotive India Ltd. कंपनीच्या गणपतीची आरती गुरुवारी (दि. २४ सप्टेंबर) सचिन अहिर यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी आमदार महेश लांडगे, शिवसेना उपनेत्या व ज्येष्ठ नगरसेविका सुलभा उबाळे, समन्वयक सोमेश वैद्य तसेच कंपनीचे अधिकारी, कामगार संघटनेचे पदाधिकारी आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
आरतीनंतर माध्यमांशी संवाद साधताना सचिन अहिर यांनी महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीबाबत भाष्य केले. राज्य सरकारने दुष्काळाची दखल घेतली असून, केवळ अहवालावर अवलंबून न राहता मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी संवाद साधत असल्याचे त्यांनी सांगितले.
सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दुष्काळाच्या परिस्थितीबाबत तीन दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अहवाल प्राप्त झाल्यानंतर मुख्यमंत्री याबाबत निर्णय जाहीर करतील, असे अहिर यांनी सांगितले.
विशेष अधिवेशनाचा प्रस्ताव नाही
दुष्काळाच्या प्रश्नावर विशेष अधिवेशन घेण्याबाबत विचारले असता सचिन अहिर म्हणाले की, दुष्काळासाठी स्वतंत्र विशेष अधिवेशन घेण्याचा प्रस्ताव सध्या सरकारकडे नाही. पुढील दीड ते दोन महिन्यांत अधिवेशन होणार असून, त्या अधिवेशनात आमदारांना दुष्काळाच्या परिस्थितीबाबत आपली भूमिका मांडता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
काही भागांत धरणे भरली असली तरी काही ठिकाणी पिके करपल्याचे चित्र आहे. त्यामुळे संकटग्रस्त शेतकऱ्यांना मदत करणे आवश्यक असल्याचेही अहिर यांनी नमूद केले.
चारा छावण्यांबाबतही माहिती
शेतकऱ्यांपर्यंत प्रत्यक्ष मदत पोहोचविण्याला प्राधान्य देण्यात येत असल्याचे सांगताना अहिर यांनी जालना, अमरावती आणि नागपूर येथे पक्षाच्या वतीने चारा छावण्या सुरू केल्याची माहिती दिली. तसेच इतर पक्ष आणि सामाजिक संस्थांनीही चारा छावण्या सुरू करण्यासाठी योगदान दिल्याचे त्यांनी सांगितले.
डीजेऐवजी पारंपरिक वाद्यांना प्राधान्य
गणेशोत्सवादरम्यान डीजेच्या वापराबाबत विचारलेल्या प्रश्नावर सचिन अहिर यांनी उत्सव उत्साहात साजरा करण्यासोबतच परंपरेचेही जतन झाले पाहिजे, असे मत व्यक्त केले.
“मी कामगारांचा प्रतिनिधी म्हणून दरवर्षी कामगारांसोबत भक्तिभावाने गणेशोत्सवात सहभागी होतो. माझ्या कामगार संघटनादेखील कोठेही डीजे न लावता पारंपरिक वाद्यांचा वापर करून गणरायाची आराधना करतात,” असे अहिर यांनी सांगितले.
माझा इंडिया न्यूज प्रतिनिधी
सत्य | निर्भीड | विश्वासार्ह


#सचिन अहिर #गणपती बाप्पा दर्शन #पिंपरी चिंचवड #भोसरी #CIA Automotive pvt Ltd
https://www.facebook.com/share/r/1C6TpGTrEa/


