E-Paperटॉप न्यूज़देशधर्मपिंपरी चिंचवडमहाराष्ट्र

आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे प्रबोधन पर्वाच्या अध्यक्षपदी नानासाहेब कांबळे यांची निवड!

२०२६-२०२७ या वर्षासाठी नूतन कार्यकारिणी जाहीर; विविध पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्यांवर नियुक्ती

आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे प्रबोधन पर्वाच्या अध्यक्षपदी नानासाहेब कांबळे यांची निवड!

२०२६-२०२७ या वर्षासाठी नूतन कार्यकारिणी जाहीर; विविध पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्यांवर नियुक्ती

पिंपरी | माझा इंडिया न्यूज

आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे प्रबोधन पर्व २०२६-२०२७ या वर्षाच्या अध्यक्षपदी नानासाहेब कांबळे यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. तसेच पर्वाच्या विविध पदांवर नव्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली असून, सचिवपदी प्रा. उत्तम सकटे, महिला अध्यक्षपदी सौ. दीपाली लोंढे, कार्याध्यक्षपदी शिवाजी खडसे, खजिनदारपदी भाऊ कसबे, तर उपाध्यक्षपदी संजय साठे यांची निवड करण्यात आली आहे.

ज्येष्ठ नेते भाऊसाहेब अडागळे यांच्या अध्यक्षतेखाली आणि ज्येष्ठ मार्गदर्शक संदिपान झोंबाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत या निवडी जाहीर करण्यात आल्या.

या बैठकीस सा. लो. डॉ. अण्णा भाऊ साठे प्रबोधन पर्वाचे मा. अध्यक्ष नाना कसबे, मा. अध्यक्ष डी. पी. खंडाळे, सचिव प्रसाद केसरे, महिला आघाडी अध्यक्षा उषामाई कांबळे, आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे प्रबोधन पर्वाचे माजी अध्यक्ष संजय धुतडमल, राजू आवळे, सागर चव्हाण तसेच लोकसेवक युवराज दाखले यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

नूतन कार्यकारिणीच्या माध्यमातून आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचे विचार, सामाजिक समता, शैक्षणिक प्रबोधन आणि समाजजागृतीचे कार्य अधिक प्रभावीपणे पुढे नेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

नूतन अध्यक्ष नानासाहेब कांबळे व सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे विविध स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.

#Nana Kambale #Vastadlahujisalvejayanti #Pimpri Chinchwad

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!