E-Paper

“तमारा सोसायटीतील नागरिकांची बिल्डरने 6 वर्षे फसवणूक; OC नाही, लिफ्ट बंद, पार्किंग घोटाळा” – लोकसेवक युवराज दाखले यांचा आरोप; आयुक्तांना निवेदन, 7 दिवसांत कारवाई नाही तर आमरण उपोषणाचा इशारा..

 

तमारा सोसायटीतील नागरिकांची बिल्डरने 6 वर्षे फसवणूक; OC नाही, लिफ्ट बंद, पार्किंग घोटाळा” – लोकसेवक युवराज दाखले यांचा आरोप; आयुक्तांना निवेदन, 7 दिवसांत कारवाईनाही तर आमरण उपोषणाचा इशारा..

रहाटणी, दि. 29 मे 2026: प्रतिनिधी (माझा इंडिया न्यूज) रहाटणी येथील तमारा हाऊसिंग सोसायटीमधील 350 कुटुंबांची बिल्डर व विकासकाने 6 वर्षे घोर फसवणूक केल्याचा गंभीर आरोप लोकसेवक युवराज दाखले यांनी केला आहे. कन्व्हेयन्स डीड नाही, OC नसताना ताबा, लिफ्ट-फायर नादुरुस्त, पार्किंग घोटाळा करून बिल्डरने कोट्यवधी रुपये लुटले आहेत. याबाबत आज पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले असून, 7 दिवसांत कारवाई न झाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा दाखले यांनी दिला आहे.

लोकसेवक युवराज दाखले म्हणाले, “2019 मध्ये ताबा देऊनही बिल्डरने आजपर्यंत कन्व्हेयन्स डीड सोसायटीच्या नावे केली नाही. मंजूर नकाशाप्रमाणे पार्किंग न देता एकाच पार्किंगची 3-3 जणांना विक्री केली. लिफ्ट आठवड्यातून 3 दिवस बंद असते. फायर सिस्टीमला पाणीच नाही. क्लब हाऊस, जिम, गार्डन फक्त कागदावर आहे. OC नसल्याने नागरिकांना मालमत्ता करात 2 पट दंड भरावा लागतोय. वरून 3000 रु. मेंटेनन्स वसूल करून हिशोब मागताच बिल्डरचे गुंड धमक्या देतात. हा नागरिकांच्या जिवाशी खेळ आहे.”

“दि. 23 मे पासून नागरिकांनी साखळी उपोषण सुरू केल्यावर दि. 26 मे रोजी ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयात बैठक झाली. बिल्डरने लेखी आश्वासन दिले. पण बिल्डरच्या आश्वासनावर आमचा विश्वास नाही. आयुक्तांनी स्वतः लक्ष घालून बिल्डरवर कारवाई करावी,” अशी मागणी युवराज दाखले यांनी केली.

*शिवशाही शासनाच्या मागण्या:*
1. 7 दिवसांत लिफ्ट, फायर, पाणी सुविधा सुरू करा, अन्यथा बिल्डरच्या सदनिका सील करा.
2. 3 महिन्यात कन्व्हेयन्स डीड पूर्ण न झाल्यास महारेरा कायदा कलम 11 नुसार फौजदारी गुन्हा दाखल करा.
3. OC मिळेपर्यंत मालमत्ता करातील दंड माफ करा.
4. बिल्डरला पाठीशी घालणाऱ्या PCMC च्या स्थापत्य व बांधकाम परवानगी विभागाच्या अधिकाऱ्यांची चौकशी करा.

“दि. 2 जून 2026 पर्यंत अत्यावश्यक सुविधा सुरू झाल्या नाहीत, तर 3 जूनपासून मी स्वतः बिल्डरच्या ऑफिससमोर आमरण उपोषणाला बसेन. नागरिकांच्या जीवितास काही झाले तर त्याला सर्वस्वी आयुक्त व बिल्डर जबाबदार असेल,” असा सज्जड इशारा युवराज दाखले यांनी दिला.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!