E-Paperटॉप न्यूज़दुनियादेशधर्ममहाराष्ट्रयुवाराजनीतिराज्यलोकल न्यूज़
Trending

महानगरपालिकेत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विचार प्रबोधनपर्व २०२६ संदर्भात आढावा बैठक उद्या

📰 माझा इंडिया न्यूज

महानगरपालिकेत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विचार प्रबोधनपर्व २०२६ संदर्भात आढावा बैठक उद्या

पिंपरी, दि. १ जुलै : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विचार प्रबोधनपर्व २०२६ चे आयोजन १ ते ५ ऑगस्ट या कालावधीत निगडी येथील भक्ती-शक्ती चौक परिसरातील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारक येथे करण्यात येणार आहे.

या प्रबोधनपर्वात शहरातील विविध सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था, ट्रस्ट, कामगार संघटना तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत असतात.

या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी व विविध बाबींवर चर्चा करण्यासाठी महानगरपालिकेचे पदाधिकारी, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी, विविध संस्थांचे प्रतिनिधी, पोलिस प्रशासन आणि महापालिकेचे अधिकारी यांची समन्वय आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे.

ही बैठक गुरुवार, दि. २ जुलै २०२६ रोजी दुपारी १२.३० वाजता पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील दिवंगत माजी महापौर मधुकरराव पवळे सभागृहात महापौर रवि लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.

या बैठकीस संबंधित सर्व मान्यवरांनी उपस्थित राहावे, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागामार्फत करण्यात आले आहे.


– माझा इंडिया न्यूज

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!