पिंपरी-चिंचवड महापालिकेतील २१ अधिकारी-कर्मचारी सेवानिवृत्त
१९ जण नियत वयोमानानुसार, तर २ कर्मचाऱ्यांनी स्वीकारली स्वेच्छानिवृत्ती; मनोज लोणकर यांच्या हस्ते सन्मान

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील २१ अधिकारी-कर्मचारी सेवानिवृत्त
१९ जण नियत वयोमानानुसार, तर २ कर्मचाऱ्यांनी स्वीकारली स्वेच्छानिवृत्ती; मनोज लोणकर यांच्या हस्ते सन्मान

पिंपरी-चिंचवड | दि. ३० सप्टेंबर २०२६
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सेवेत सप्टेंबर २०२६ अखेर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्या १९ अधिकारी-कर्मचाऱ्यांसह स्वेच्छानिवृत्ती स्वीकारलेल्या २ कर्मचाऱ्यांचा, अशा एकूण २१ अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील दिवंगत मधुकर पवळे सभागृहात आयोजित कार्यक्रमात सह आयुक्त मनोज लोणकर यांच्या हस्ते सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी मनोज लोणकर यांनी, “वर्षानुवर्षे निष्ठा, शिस्त आणि कर्तव्यभावनेने शहराची सेवा करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांमुळेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिका भक्कम पायावर उभी आहे,” असे सांगत सेवानिवृत्तांच्या कार्याचा गौरव केला.
१९ कर्मचारी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त
सप्टेंबर २०२६ मध्ये नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्यांमध्ये उपअभियंता गणेश राऊत, कार्यालय अधीक्षक रमेश यादव, मुख्याध्यापक पुष्पा शिंदे, रजनी आहेर, अनुजा सोनगरे, मुख्य लिपिक रामू गेंगजे, रोहिणी ढेंबरे, सिस्टर इनचार्ज पौर्णिमा आमले, जलधारा टिपले, कॉम्प्युटर ऑपरेटर अरुण गुंडगळ, उपशिक्षक नीलिमा भांबेरे, सुनिता शेजवळ, रखवालदार बाळू लांडगे, लिफ्टमन विलास गायकवाड, मजूर हंसराज सजनियाल, लक्ष्मण मानमोडे, पांडुरंग गवारी, तसेच सफाई कामगार सविता काळभोर आणि नंदकुमार भोंडवे यांचा समावेश आहे.
दोघांनी स्वीकारली स्वेच्छानिवृत्ती
तर सफाई कामगार राजेश गंगावणे आणि कचरा कुली गणेश यादव यांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली.
या सर्वांच्या महापालिका सेवेत दिलेल्या योगदानाबद्दल कार्यक्रमात कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
यावेळी मुख्य कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, मुख्य लिपिक माया वाकडे, नंदकुमार इंदलकर यांच्यासह विविध विभागांतील अधिकारी-कर्मचारी तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप यांनी केले. सूत्रसंचालन व आभार जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी मानले.
माझा इंडिया न्यूज | सत्य | निर्भीड | विश्वासार्ह
#pcmc #सेवानिवृत्त कर्मचारी #PIMPRI चिंचवड



