
� माझा इंडिया न्यूज
महानगरपालिकेतर्फे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना जयंतीनिमित्त अभिवादन
दूरदृष्टी असलेले मुत्सद्दी राजकारणी होते वसंतराव नाईक – महापौर रवी लांडगे
पिंपरी, दि. १ जुलै २०२६ : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाणारे दिवंगत वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात आयोजित कार्यक्रमात महापौर रवी लांडगे यांनी वसंतराव नाईक यांच्या कार्याचा गौरव करताना, “महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी सलग अकरा वर्षे विराजमान राहून राज्याच्या विकासाला नवी दिशा देणारे वसंतराव नाईक हे दूरदृष्टी असलेले मुत्सद्दी राजकारणी होते,” असे प्रतिपादन केले.
यावेळी उपमहापौर शर्मिला बाबर, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, उपआयुक्त अण्णा बोदडे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी आणि महापालिकेच्या विविध विभागांतील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात उपस्थितांनी वसंतराव नाईक यांच्या कार्याला आदरांजली वाहत त्यांच्या विकासाभिमुख, लोककल्याणकारी आणि शेतकरीहिताच्या विचारांचा आदर्श समाजाने जपण्याची गरज व्यक्त केली.
📰 माझा इंडिया न्यूज
“विश्वसनीय बातम्या… जनतेच्या विश्वासासाठी.”


