कृष्णानगर चौकातील ‘कोमल वाईन्स’वर कारवाईची मागणी; नागरिकांच्या त्रासाबाबत प्रशासनाकडे निवेदन

कृष्णानगर चौकातील ‘कोमल वाईन्स’वर कारवाईची मागणी; नागरिकांच्या त्रासाबाबत प्रशासनाकडे निवेदन

उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार व चिखली पोलिसांकडे मारुती गणपत जाधव यांची लेखी तक्रार
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी :
पिंपरी-चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक ११, कृष्णानगर येथील ‘कोमल वाईन्स’ परिसरात मद्यविक्रीमुळे नागरिकांना होत असलेला त्रास, सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी आणि वाहतुकीला निर्माण होणाऱ्या अडथळ्यांबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मारुती गणपत जाधव यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार तसेच चिखली पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडे लेखी निवेदनाद्वारे तक्रार केली आहे.
निवेदनानुसार, कोमल वाईन्स परिसरात दररोज मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून, त्यामुळे स्थानिक नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि लहान मुलांना याचा त्रास होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
कृष्णानगर, कोयना नगर, शरद नगर, घरकुल, महात्मा फुले नगर आणि शिवाजी पार्क हा मोठ्या लोकवस्तीचा परिसर असल्याने सार्वजनिक शांतता, नागरिकांची सुरक्षितता आणि वाहतूक व्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे.
यावेळी कर्मयोगी संत गाडगेबाबा जागृती मंच, महात्मा फुले नगरचे अध्यक्ष यशवंत कन्हेरे काका, कोयना नगर कृती समितीचे उपाध्यक्ष रामचंद्र गुरव तसेच इंगवले काका उपस्थित होते.
दरम्यान, प्रशासनाने कोमल वाईन्स परिसराची तातडीने पाहणी करून वस्तुस्थितीची चौकशी करावी, नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी आणि परिसरात नियमित पोलीस गस्त वाढवून नागरिकांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
“नागरिकांच्या सुरक्षिततेशी आणि सार्वजनिक शांततेशी कोणतीही तडजोड होता कामा नये. प्रशासनाने या तक्रारीची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने योग्य ती कारवाई करावी,” अशी मागणी मारुती गणपत जाधव यांनी केली आहे.
माझा इंडिया न्यूज
आपल्या परिसरातील प्रत्येक बातमी, थेट आणि निर्भीड!
#माझाइंडियान्यूज #MajhaIndiaNews #कृष्णानगर #पिंपरीचिंचवड #कोमलवाईन्स #कोमलवाईन्सवरकारवाई #वाईन्सशॉप #नागरिकांचात्रास #नागरिकांचीसुरक्षा #चिखलीपोलीस #चिखलीपोलीसस्टेशन #पिंपरीचिंचवडन्यूज #पुणेन्यूज #स्थानिकबातम्या #ब्रेकिंगन्यूज #मराठीबातम्या #MarathiNews #PimpriChinchwadNews #PuneNews #PoliceAction #CitizenSafety




