“म्हातारा होशील, पण ती मागणी मान्य होणार नाही!” गुणरत्न सदावर्तेंची मनोज जरांगे
गुणरत्न सदावर्तेंची मनोज जरांगे पाटील यांच्यावर घणाघाती टीका

“म्हातारा होशील, पण ती मागणी मान्य होणार नाही!”
गुणरत्न सदावर्तेंची मनोज जरांगे पाटील यांच्यावर घणाघाती टीका

मुंबई | प्रतिनिधी
अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली आहे.
जरांगे पाटील यांच्या आरक्षणाच्या मागणीवर भाष्य करताना सदावर्ते यांनी, “तुम्ही म्हातारे व्हाल, हातात काठी येईल; पण पोलिस केस मागे घेण्याची मागणी कधीच मान्य होणार नाही,” असे वक्तव्य केल्याचे समोर आले आहे.
तसेच ५८ लाख कुणबी नोंदी आणि आरक्षणाच्या मागणीवरून संविधानाच्या विरोधात वागत असल्याचा आरोप सदावर्ते यांनी केला. शरद पवार यांच्या भूमिकेवरही त्यांनी प्रश्न उपस्थित करत, “पवारांनी छातीवर हात ठेवून सांगावे की एकाच वर्गाला तीन वेगवेगळी आरक्षणे मिळू शकतात का?” असा सवाल केला.
दरम्यान, सदावर्ते यांच्या या वक्तव्यामुळे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राजकीय आणि सामाजिक चर्चेला पुन्हा उधाण येण्याची शक्यता आहे.
📍 अधिक बातम्यांसाठी जोडलेले रहा — माझा इंडिया न्यूज
#माझाइंडियान्यूज #ManojJarangePatil #GunaratnaSadavarte #MarathaReservation #MarathaAarakshan #MaharashtraPolitics #SharadPawar #MarathaAndolan #MaharashtraNews #BreakingNews


