पिंपळे सौदागरमध्ये ‘ओपन बार’चा विळखा; मद्यपींच्या अड्ड्यामुळे नागरिक त्रस्त – नगरसेविका अनिता काटे

पिंपळे सौदागरमध्ये ‘ओपन बार’चा विळखा; मद्यपींच्या अड्ड्यामुळे नागरिक त्रस्त – नगरसेविका अनिता काटे
पिंपळे सौदागर: दिनांक १४जुलै ; प्रतिनिधी (माझा इंडिया न्यूज)
पिंपळे सौदागरमधील लिनियर गार्डनलगत आणि कॅस्टालिया सोसायटीसमोरील मोकळ्या जागेत खुलेआम मद्यपान सुरू असून, या परिसराचे रूपांतर ‘ओपन बार’मध्ये झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या मद्यपींच्या त्रासामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण असून, नगरसेविका अनिता संदीप काटे यांनी पोलीस व महापालिका प्रशासनाकडे यावर तात्काळ कठोर कारवाईची मागणी केली आहे.
🛑स्थानिक रहिवाशांना मोठा त्रास
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, या मोकळ्या जागेत दररोज मोठ्या संख्येने मद्यपींचा जमाव असतो. परिसरात अनेक उच्चभ्रू सोसायट्या असल्याने महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. अनेकदा पोलिसांकडे तक्रारी करूनही केवळ वरवरची कारवाई होत असल्याने मद्यपींचे फावले आहे.
🛑परिसरातील शांतता धोक्यात..
मद्यपींच्या या अड्ड्यामुळे परिसरातील शांतता भंग होत असून, वादविवाद, भांडणे आणि शिवीगाळीचे प्रकार नित्याचे झाले आहेत. विशेषतः शेजारील लिनियर गार्डनमध्ये फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला असून, कोणतीही अनुचित घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
🛑नगरसेविका अनिता काटे यांची आक्रमक भूमिका
या समस्येबाबत नगरसेविका अनिता संदीप काटे यांनी प्रशासनाला धारेवर धरले आहे. त्यांनी केलेल्या प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे आहेत:
🤔 कठोर कारवाई:
पोलीस प्रशासनाने या बेकायदा अड्ड्यावर तातडीने कारवाई करावी.
🛑सीसीटीव्ही व सुरक्षा: महापालिकेने सुरक्षेच्या दृष्टीने परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत.
🛑सुरक्षा रक्षक:मोकळ्या जागेवर सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करावी.
🛑नियमित गस्त : परिसरात पोलिसांची नियमित गस्त वाढवून कायमस्वरूपी तोडगा काढावा.
स्थानिक नागरिक आता प्रशासनाच्या ठोस कारवाईच्या प्रतीक्षेत असून, मोकळ्या जागेवरील हा ‘ओपन बार’ बंद होण्याची मागणी जोर धरत आहे.
#pcmc #daruadda #पोलिस #नागरिक #CM #anitasandipkate #openbar





