
मातंग समाजाच्या अ-ब उपवर्गीकरणासाठी ऐतिहासिक पायी मोर्चा यशस्वी…!! शासनाला युवराज दाखले यांचा इशारा..? 🤝🏽💯👏

मुंबई/पिंपरी-चिंचवड, दि. २४ जून २०२६ – मातंग समाजाच्या अ-ब उपवर्गीकरण (आरक्षण वर्गीकरण) मागणीसाठी काढण्यात आलेला ऐतिहासिक पायी मोर्चा आज मोठ्या उत्साहात आणि प्रचंड जनसमर्थनासह पार पडला. हजारो मातंग बांधवांनी या मोर्चात सहभाग घेत शासनाचे लक्ष वेधून घेतले.
शिवशाही शासन पक्षाचे संस्थापक प्रमुख लोकसेवक युवराज भगवान दाखले यांनी मोर्चाला संबोधित करताना सांगितले की, मातंग समाज आता संघटित झाला असून अ-ब उपवर्गीकरणाचा निर्णय तातडीने घेण्यात यावा. सर्वोच्च न्यायालयाने १ ऑगस्ट २०२४ रोजी उपवर्गीकरणास परवानगी दिली असून शासनाने आयोग स्थापन करून लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण लागू करावे, अशी मागणी त्यांनी केली.
मोर्चामध्ये दोन प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या. त्यामध्ये मातंग समाजाला अनुसूचित जातींमधील ‘ब’ प्रवर्गात समाविष्ट करून लोकसंख्येच्या प्रमाणात ७ टक्के आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली. तसेच मुंबईतील आझाद मैदानाचे नामकरण ‘क्रांतीसूर्य बाबासाहेब गोफले मैदान’ असे करण्याची मागणीही करण्यात आली.
युवराज दाखले यांनी शासनाला इशारा देताना सांगितले की, पुढील ३० दिवसांत उपवर्गीकरणाबाबत निर्णय घेऊन आयोगाची घोषणा करण्यात आली नाही, तर मंत्रालयावर भव्य महामोर्चा काढण्यात येईल. मातंग समाजाच्या न्याय्य हक्कांसाठीचा संघर्ष अधिक तीव्र करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी उपवर्गीकरणाच्या आंदोलनात बलिदान दिलेल्या शहीद संजय ताकतोडे, शहीद अविनाश खंडागळे आणि इतर आंदोलकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. “त्यांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही. समाजाच्या हक्कांसाठीचा लढा अधिक जोमाने सुरू राहील,” असे मत उपस्थित नेत्यांनी व्यक्त केले.
या मोर्चात युवराज दाखले यांच्यासह नामदेव अण्णा रिटे, चंद्रकांत दादा लोंढे, सरोज कांबळे, मंगेश डाखोरे, कृष्णा साबळे, कल्पना मोरे-दाखले, उषाबाई कांबळे, अर्चनाताई शिंदे, राजू आवळे, अविनाश शिंदे, शंकर खवळे, अविनाश गायकवाड, आकाश घोलप आदी पदाधिकारी उपस्थित होते. तसेच विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन साठे, विष्णू कसबे, शंकर तडाके, भास्कर नेटके, अशोक लोखंडे, दीपक आवारे, हर्षद खान, दीपक कसबे, शिवाजीराव खडसे, गीता आढागळे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी मोर्चात सहभाग घेतला.
“जय लहुजी! जय क्रांतीसूर्य बाबासाहेब गोफले! अ-ब उपवर्गीकरणाचा विजय असो!” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला.




